आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या, उपबाजार आवार वैराग येथील मुख्य कार्यालयाचे लोकार्पण माजी जि.प. सदस्य संतोष दादा निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

तसेच उपबाजार आवार वैराग याठिकाणी १२ लाख, २४ हजार, १६० रूपये खर्चून नव्याने पिण्याचे पाण्याची पाईपलाईन टाकणे व २४ लाख, ७२ हजार, ४७० रूपये खर्चून उपबाजार आवार वैरागची संरक्षक भिंत दुरुस्ती करणे या कामांचे भूमिपूजन माजी जि.प. सदस्य संतोष दादा निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती रणवीर भैय्या राऊत, उपसभापती झुंबर दादा जाधव, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक वैराग नगर पंचायतचे नगरसेवक शाहूराजे निंबाळकर, वैजिनाथ आण्णा आदमाने, बाजार समिती संचालक वासुदेव बापू गायकवाड, नाना शेळके, पिंटू घोडके, सचिन मडके, वैभव गांधी व व्यापारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल