बार्शी – जुन्या पिढीतील बार्शीचे नगराध्यक्ष स्व.चांदमल गुगळे यांच्या प्रेरणेने गुगळे परिवाराच्या वतीने मागील नऊ वर्षापासून विनाकारण भोजन हा अन्नदानाचा विधायक उपक्रम राबविण्यात येत आहे.

चातुर्मासाच्या पूर्वी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील नऊ वर्षापासून अखंडपणे अन्नदानाचा उपक्रम हा बार्शी व परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. आजोबांच्या पश्चात नातवांनी हा सेवाभाव जपला आहे.

बार्शीच्या उद्योग व सराफ व्यवसायिक असलेले चांदमल गुगळे यांचे सुपुत्र स्व. अमृतलाल उर्फ बाबांनी विनाकारण भोजन या अन्नदान उपक्रमाची सुरवात 2014 साली केली. मागील काही महिन्यापूर्वी अमृतलाल बाबांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर ही अन्नदानाची परंपरा गुगळे परिवारातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले शशांक, दर्शन अतुल व गुगळे परिवारातील सदस्यांनी अखंडीतपणे सुरू ठेवत रविवारी (ता.3) विनाकारण भोजनासाठी नागरिकांना निमंत्रीत करून अन्नदानाचा हा पायंडा अखंडीत ठेवला.
मागील सलग दोन वर्ष कोरोना महामारीतही स्व.अमृतलाल बाबांनी कोरोना काळात शहरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्यांना व अधिकारी वर्गाला दोन वेळचा नाश्ता दिला तसेच नागरिकांना घरपोच मिठाई वाटप करत अन्नदानाचा हा विधायक उपक्रम खंडीत होऊ दिला नाही. रविवारी चांदमल गुगळे परिवाराने आयोजित केलेल्या भोजनाचा विविधस्तरातील नागरिकांनी महिलांनी उपस्थित राहून आस्वाद घेतला.
अमृतलाल बाबांच्या निधनानंतरचा त्यांच्या गैरहजेरीत चांदमल गुगळे परिवाराने आयोजित केलेल्या या नियोजनबध्द व उत्साहात पार पडलेल्या अन्नदानाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award
आज ११ वाजता बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रम