दिनांक २५ एप्रिल २०२५ :- विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य (धाराशिव), मौजे ग्रामस्थ निपाणी ता.भूम, तेजस्वी फौंडेशन पुणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ईट ता. भूम संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन ह.भ.प.गिरीधर (बापू) सामनगावकर व ह. भ. प. मेघराज (तात्या) सामनगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून शिबीराची सुरुवात करण्यात आली.

मेघराज (तात्या) सामनगावकर यांनी रक्तदान हे शरीराशिवाय निर्माण होत नाही ते कोठेही निर्माण होत नाही ते रक्तदान हे लहान मुले, महिला वयोवृद्ध व्यक्ती असतील अशा सर्वांनाच रक्तदानाने जिवदान मिळते असे रक्तदानाचे महत्त्व सांगितले. निपाणी येथील महिलांनी व तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरामध्ये सहभागी झाले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ईट चे डॉ.सुबोध माने वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी डॉ. अश्विनी सोनवणे, सिमला गवळी सिस्टर, निपाणी आशाताई अनुराधा कोकाटे यांनी नागरीकांच्या आरोग्याची तपासणी केली.

त्यावेळी डॉ.सुबोध माने, अश्विनी सोनवणे व सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती धाराशिव तथा तेजस्वी फौंडेशन धाराशिव व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

More Stories
बार्शीच्या भगवंत अभियांत्रिकी मध्ये बीसीए प्रवेश परीक्षा कार्यशाळा संपन्न
भाजप शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा महावीर कदम, तालुक्यात 3 निवडी जाहीर
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन संघटनेच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न