Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > अक्कलकोटे परिवाराच्या वतीने, बार्शीकरांच्या सेवेसाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्स रुजू

अक्कलकोटे परिवाराच्या वतीने, बार्शीकरांच्या सेवेसाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्स रुजू

मित्राला शेअर करा

कै.हरिभाऊ बाबुराव अक्कलकोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण चे औचित्य साधुन श्री गणपती मंदिर देवस्थान १७ वा पुठ्ठा रोडगा रस्ता बार्शी,या ट्रस्ट ला मंगळवार दि २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायं ६ वा लिंगायत बोर्डिंग बार्शी या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ पुर्वक मंगळवारी हा कार्डियाक रुग्णवाहिका लोकार्पण समारंभ पार पडला.

सदर कार्डियाक रुग्णवाहिका सर्व सोईनी सज्ज असल्यामुळे व सोबत डॉक्टर उपलब्ध असतात त्यामुळे अत्यवस्थ रूग्णांना सुद्धा दुसर्‍या गावी सुरक्षितरित्या स्थलांतरीत करता येईल

या कार्यक्रमासाठी समस्त बार्शीकरांची उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे, बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी आवाहन केले होते.

कोरोनाच्या लाटेत आरोग्य सेवांवर प्रचंड ताण पडलेला होता परिणामी ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर सुविधा किंवा अश्या अनेक अडचणींना सर्वांचा सामोरे जावे लागले होते.


बार्शी शहराचा विचार करता या कठीण काळात शहरातील सर्वच तरुण मंडळे,सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी,अश्या सर्व लोकांनी शक्य तेवढे प्रयत्न केले.जेणेकरून लोकांचीही मदत झाली व आरोग्य यंत्रणेवरील भार काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत झाली

रक्तदानाच्या बाबतीत तर बार्शी शहर हे स्वयंपूर्ण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही

सादर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा लिंगायत बोर्डिंग येथे आयोजित करण्यात होता नागेश अक्कलकोटे यांनी यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलेकी.माजी नगरसेविका सुशीला अक्कलकोटे यांचे पती व विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांचे वडील हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून अक्कलकोटे परिवाराच्या वतीने श्री गणपती मंदिर देवस्थान १७ वा पुट्टा रोडगा रस्ता बार्शी या नोंदणीकृत व पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या ट्रस्टला कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स देण्याचा निर्णय घेण्यात आला.


माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते,ह.भ.प. डॉ.जयवंत बोधले यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी ६ वाजता लिंगायत बोर्डिंग येथे हा सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यासाठी प्रांताधिकारी हेमंत निकम,पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर,महाहौसिंगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर तहसीलदार सुनील शेरखाने,पोलीस निरीक्षक रामदास शेळके, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ बी.वाय. यादव,उपाध्यक्ष नंदन जगदाळे, नगरपरिषद मुख्याधिकारी अमिता दगडे -पाटील,आयएमए अध्यक्ष डॉ.प्रशांत मोहिरे, कोविडयोद्धा डॉ.संजय अंधारे,मराठा एकता मंडळाचे अध्यक्ष डॉ.भरत गायकवाड,मंगल शेळवणे, गणेश जाधव,दगडू मांगडे, योगेश सोपल,कादर तांबोळी,दत्तात्रय शिंदे , राजाभाऊ रसाळ, बाळासाहेब आडके राहुल कोंढारे,अरुणा परांजपे , माया माने,संदीप बारंगुळे आदी मान्यवर उपस्थित होते.