Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > अक्षर भारती सेवा इंटरनॅशनल, ACI Worldwide आणि महाराष्ट्र संत विद्यालय, तेर यांच्या वतीने पूरग्रस्तांना किराणा किट वाटप

अक्षर भारती सेवा इंटरनॅशनल, ACI Worldwide आणि महाराष्ट्र संत विद्यालय, तेर यांच्या वतीने पूरग्रस्तांना किराणा किट वाटप

मित्राला शेअर करा

दुःखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक आहे

मागील महिन्यात आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उध्वस्त केले, कित्येक कुटुंबे खचली !

II एकमेका कमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ II


कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या ब्रीदवाक्य नुसार आपले समाजाप्रती एक ऋण, कर्तव्य आहे व ती पूर्ण करण्याची संधी या निमित्ताने पूरग्रस्तांसाठी अल्पशीमदत या भावनेतून

अशा खचलेल्या कित्येक कुटुंबांना त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मदतीचा एक हात पुढे करण्यासाठी अक्षर भारती सेवा इंटरनॅशनल, ACI Worldwide आणि महाराष्ट्र संत विद्यालय, तेर यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना दिवाळीच्या निमित्ताने ४०० किराणा किटचे वाटप करण्यात आले.


तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाच्या प्रांगणात सोमवार दिनांक: ०१ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११ वा हा किराणा कीट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.