बार्शी : मॉडेल हायस्कूल च्या भव्य प्रांगणात ध्वजारोहण बालरोगतज्ज्ञ डॉ सुनील पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. प्रसिद्ध ऑडिटर पुष्कर लड्डा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सचिव चिन्मय वालवडकर यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगितला व पर्यावरण रक्षणासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे विचार व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे सुनील पाटील यांनी आपल्या मनोगता मधून शाळा हे उत्तम नागरिक तयार करण्याचे केंद्र आहे असे सांगितले व सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी सर्व शाखामधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी भाऊसाहेब कांबळे व रविकिरण पोरे यांनी संगीत साथ दिली.
मान्यवरांच्या हस्तेगुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व गरजू विद्यार्थ्यांना गणवेष वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास राजेन्द्र शेटे,दिवाकर नारकर, अनंत गायकवाड, नागनाथ देवकते, पुष्पा मोहितेअनुराधा देशमुख, वैष्णवी हातोळकर, वैशाली कांबळे, महाजन मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश घाडगे व रेखा गुंड यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका शुभदा जोशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी