Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन संघटनेच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन संघटनेच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन संघटनेच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
मित्राला शेअर करा

बार्शी:-दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ( AIBEA ) या बँकिंग क्षेत्रातील बलाढ्य संघटनेचा 80 वा स्थापना दिवस आहे. या दिवशी देशभरामध्ये विविध उपक्रम राबवून संघटनेचा स्थापना दिन साजरा केला जातो.

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने राज्यभरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


त्याचाच एक भाग म्हणून बँक कर्मचारी समन्वय समिती बार्शीच्या वतीने, रामभाई शहा रक्तपेढी, जवाहर हॉस्पिटल बार्शी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जवळपास 15 लोकांनी याठिकाणी रक्तदान केले.

यात बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे करमाळा, निमगाव टेंभुर्णी, श्रीपूर, बार्शी या शाखांतील कॉम्रेड्सनी सहभाग नोंदवला याठिकाणी समितीचे अध्यक्ष कॉ. राहुल मांजरे समन्वयक कॉ. सरिता कुलकर्णी आणि बँक कर्मचारी उपस्थित होते .