कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सात महिन्यांपासून लांबलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर १९ ते २१ नोव्हेंबरला नाशिकमध्ये होणार आहे. त्यानुसार तयारीला लागण्याच्या सूचना संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समित्यांना दिल्या.

तयारी सुरू झाली असली तरी संमेलनावर कोरोनाची टांगती तलवार कायम आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आणि लोकहितवादी मंडळ निमंत्रक असलेले हे संमेलन नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर होणार आहे. येवला, निफाड, सिन्नर तालुक्यात व शेजारील अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. मात्र, पुढील दीड महिन्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरच संमेलन होणार की नाही, हे अवलंबून असेल.
मार्चमध्ये होणार होते
यंदा २६ ते २८ मार्चदरम्यान मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडणार होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट व त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संमेलन लांबणीवर टाकण्यात आले होते.
साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील तसेच शेजारच्या नगर जिल्ह्यातील काही गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली असल्याने पुन्हा त्या-त्या वेळी परिस्थितीनुसार निर्णय घेऊ. ऐनवेळी धावपळ नको म्हणून संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या समित्यांना कामे सुरू करण्याच्या सूचना आहेत.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
महाराष्ट्र ढोल पथक महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शिलेदारपदी श्रीकांत जिठ्ठा आणि प्रविण परदेशी यांची निवड
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी