बार्शी- जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेंडस सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी दैनिक जनमत चे बार्शी तालुका प्रतिनिधी गणेश घोलप यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यासीन पटेल, उपाध्यक्ष गणेश गोडसे, सचिव विकास कुलकर्णी, प्रदेश अध्यक्ष अजिंक्य गोवेकर, प्रदेश सरचिटणीस समीर कुरेशी आदींच्या सहीचे निवडपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

पत्रकारितेतील योगदान याच बरोबर संघटनात्मक कौशल्य व सामाजिक कार्य आदींची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बद्दल विविध क्षेत्रातील व्यक्तींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले