Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सोलापूर विमानतळासाठी आनंदाची बातमी: SSE कोडने प्रमुख प्रवासी पोर्टलवर झाली नोंदणी

सोलापूर विमानतळासाठी आनंदाची बातमी: SSE कोडने प्रमुख प्रवासी पोर्टलवर झाली नोंदणी

सोलापूर विमानतळासाठी आनंदाची बातमी: SSE कोडने प्रमुख प्रवासी पोर्टलवर झाली नोंदणी
मित्राला शेअर करा

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी जोर धरत होती. याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. विमानतळाची चार सदस्यीय डीजीसीए पथकाने तपासणी केलीय. राहिलेल्या त्रुटी येत्या काही दिवसांत दूर करून विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

सोलापूर विमानतळावरून हवाई सेवांच्या लवकरच सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. प्रमुख ऑनलाइन प्रवास बुकिंग पोर्टल्सवर सोलापूरसाठी SSE हा विमानतळ कोड दाखविला जात आहे. यामुळे सोलापूर विमानतळावरून प्रवासी हवाई सेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत, ज्याची सोलापूरकर आतुरतेने वाट पाहत आहेत.

MakeMyTrip, Yatra, Cleartrip यांसारख्या अनेक प्रवासी बुकिंग पोर्टल्सवर सोलापूरसाठी SSE कोड जोडला गेला आहे. यामुळे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोलापूर विमानतळ प्रवासी तिकिटांमध्ये समाविष्ट झाले आहे. सोलापूरहून प्रवासी लवकरच फ्लाइट्स बुक करू शकणार आहेत, ज्यामुळे शहराच्या वाहतूक आणि आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.

प्रवासी पोर्टल्सवर सोलापूर विमानतळाची नोंदणी झाल्याने सर्व आवश्यक तयारी पूर्ण होत असल्याचे स्पष्ट होते, आणि हवाई सेवा लवकरच सुरू होणार असल्याचा आशावाद वाढला आहे. अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या सुविधांसाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत, आणि या अपडेटमुळे सोलापूरकरांना हवाई सेवा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

सोलापूर विमानतळावरून हवाई सेवा कधी सुरू होणार, याबाबतच्या अधिकृत तारखेसाठी अद्ययावत माहिती लवकरच उपलब्ध होईल.