Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ….वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जिल्ह्यातील 5474 लाभार्थ्यांना 46 कोटीचा परतावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ….वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जिल्ह्यातील 5474 लाभार्थ्यांना 46 कोटीचा परतावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ….वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जिल्ह्यातील 5474 लाभार्थ्यांना 46 कोटीचा परतावा
मित्राला शेअर करा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांकडून 441 कोटीचे कर्ज वाटप
“जिल्ह्यात अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे कार्यालय सुरू झाल्यापासून जिल्हा कार्यालयाच्या वतीने मराठा समाजातील 5 हजार 474 लाभार्थ्यांना आजपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत परतावा देण्यास सुरुवात झालेली असून त्यासाठी जवळपास 46 कोटी परतावा म्हणून दिलेले आहेत.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांनी मराठा समाजातील 5 हजार 725 लाभार्थ्यांना जवळपास 441 कोटीचे कर्ज मंजूर करून त्यांच्यातील उद्योजकाला चालना देण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला असून हे सर्व लाभार्थी त्यांच्या उद्योग व्यवसायात चांगली प्रगती करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. तसेच त्यांच्या उद्योग व्यवसायामुळे इतर अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. हे या योजनेचे यश आहे.”

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1):-

   या योजनेची मर्यादा रुपये दहा लाखाहून पंधरा लाख पर्यंत वाढवण्यात आलेली असून महामंडळामार्फत रुपये 4.5 लाखाच्या व्याज मर्यादेत  परतावा करण्यात येईल  सदर व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्षे व व्याजाचा दर जास्तीत जास्त दर साल दर शेकडा 12 टक्के इतका असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी मात्र बँकेमार्फत घेतलेले कर्ज असावे व ते फक्त व्यावसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे.

(टीप- मात्र दिनांक 20 मे 2022 पूर्वीच्या एल.ओ.आय. धारकांना नियमानुसार रुपये दहा लाखाच्या मर्यादेतील व्याज परतावा करण्यात येणार असून त्याकरता रुपये तीन लाखाची मर्यादा असेल.)

  सोलापूर जिल्ह्यात अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे कार्यालय सुरू झाल्यापासून ते आज पर्यंत 17 हजार 689 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यातील 7 हजार 869 अर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र(LOI) देण्यात आलेले आहे. तर 6 हजार 255 लाभार्थ्यांना बँकांनी कर्ज मंजूर केलेले आहे.

महामंडळाकडून व्याज परतव्यासाठी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 5 हजार 725 इतके असून या लाभार्थ्यांना जिल्ह्यातील विविध बँकांनी 441 कोटी 25 लाख 82 हजार 766 कर्ज मंजूर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहे. उपरोक्त पैकी महामंडळाकडून व्याज परतावा 5 हजार 474 लाभार्थ्यांना सुरू झालेला असून आज पर्यंत व्याज परतव्या साठी महामंडळाने 46 कोटी 77 लाख 81 हजार 465 रुपये लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहेत.


महामंडळाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना महामंडळाच्या योजनांच्या लाभ मिळवून देऊन जास्तीत जास्त उद्योजक तयार करण्यासाठी चांगले प्रयत्न सुरू केलेले आहेत व ते जास्तीत जास्त मराठा समाजातील लोकांपर्यंत पोहोचून महामंडळ अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती देऊन त्यांना या दृष्टीने लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

तरी सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील जास्तीत जास्त युवकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2018 मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित केले. तेव्हापासून ते आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील जवळपास साडेपाच हजार उद्योजक निर्माण करण्यात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला यश आलेले आहे व ही संख्या अधिक करण्यात हे कार्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. तसेच मागील वर्षभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे संपूर्ण राज्यातील मराठा समाजातील युवकांमध्ये महामंडळाच्या मार्फत सुरू असलेल्या योजनाबाबत जागृती करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मार्गदर्शन करत आहेत अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी दिली आहे.