Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > बार्शीत श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा, सहभागी होण्याचे आवाहन

बार्शीत श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा, सहभागी होण्याचे आवाहन

बार्शीत श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा, सहभागी होण्याचे आवाहन
मित्राला शेअर करा

श्रीराम नवमी निमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी मध्यवर्ती उत्सव समिती बार्शी आयोजित शोभायात्रा काढण्यात येत आहे. बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4:00 वाजता श्री भगवंत मंदिर मार्ग बार्शी येथून ही शोभायात्रा निघणार आहे.

श्रीराम नवमीनिमित्तच्या सदर शोभायात्रेचे मुख्य आकर्षण भगवान श्रीरामाची 9 फुटाची मूर्ती तसेच भगवान हनुमान जी ची 7 फुटाची मूर्ती आहे. सदर शोभायात्रा श्री राम मंदिर, भगवंतमंदिर मार्ग, महाद्वार चौक ऐनापुरमारुती, तेल गिरणी चौक, शिवाजी आखाडा ,एसटी स्टँड चौक, पोस्ट ऑफिस चौक, जुने पोलीस स्टेशन, पांडे चौक, नगरपालिका, तानाजी चौक, संकेश्वर उद्यान, एकविराई मंदिर मार्गे भगवंत मंदिरासमोर समारोप होईल.

बार्शी शहर व परिसरातील तमाम बंधू भगिनींनी, अबाल वृद्धांनी सदर शोभायात्रेत सहकुटुंब सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे. शोभा यात्रेत सहभागी होताना महिलांनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी व्हावे, तसेच पुरुषांनी पांढरा शर्ट आणि भगवी टोपी परिधान करावी असे आवाहनही समितीच्यावतीने करण्यात आले आहे.