Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > मुलींना पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत योजनेसाठी या संकेतस्थळावर अर्ज करावा

मुलींना पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत योजनेसाठी या संकेतस्थळावर अर्ज करावा

मुलींना पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत योजनेसाठी या संकेतस्थळावर अर्ज करावा
मित्राला शेअर करा

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींना पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी mahadbt या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

या योजनेची माहिती महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in ,उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://dhepune.gov.in, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://www.dtemaharashtra.gov.in , कला संचालनालयाचे https://doa.maharashtra.gov.in या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.