या नियुक्तीबद्दल नूतन प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी बुधवारी केली.

बुधवारी, दुपारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. यास सर्वांनी मान्यता दिली. नियुक्तीझाल्यानंतर नूतन प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल सर्व कर्मचारी वर्गांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल