सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे. तर धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने हे बदल्याच्या आदेश काढले आहेत. राज्याच्या गृह विभागाने भापोसे, रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीनंतर २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती झाली होती. नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे २०१५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ