Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > कला संचालनालय कार्यालयाचा मनमानी कारभार;महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचा आंदोलनाचा इशारा

कला संचालनालय कार्यालयाचा मनमानी कारभार;महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचा आंदोलनाचा इशारा

मित्राला शेअर करा

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचा कला संचालनालय कार्यालयाला दणका.

माननीय प्रदेशाध्यक्ष विनोदजी इंगोले सर, यांनी कला विषय संपवणार्या कला संचालनालयाती झारीतील शुक्राणुंची घेतली झाडाझडती!!! महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून पाठवावे सुरू आहेत मात्र त्यावर कला संचालक, व परीक्षा नियंत्रक यांच्याकडून कोणत्याही प्रकारे कार्यवाही होताना दिसून येत नाही.

शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा देखील स्वातंत्र्य पूर्वी पासून कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या परीक्षा देखील आता शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्याबाबत यांनी प्रस्ताव सादर केल्याचा संशय महासंघाला आला त्यामुळे माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी असा प्रस्तावास मंजुरी देऊ नये, शासनाने मंजूर करू नये याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. विविध केंद्र संचालकांचे केंद्र मेहनताना गेल्या पाच-सहा वर्षापासून मिळालेले नाहीत ते मिळावेत तसेच जे कलाशिक्षक ए.टी.डी व जीडी आर्ट , असूनही त्यांना प्रशिक्षित पदवीधर ची वेतनश्रेणी मुंबई विभागात मिळत नाही ही देखील तक्रार त्या ठिकाणी मांडण्यात सदर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या पंधरा दिवसात माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, यांच्या शासकीय निवासस्थान समोर महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ आंदोलन छेडेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष माननीय विनोद इंगोले यांनी दिला

यावेळी मुंबई विभाग अध्यक्ष मोहन माने,महिला अध्यक्षा सौ.भारती जाधव , उपाध्यक्ष कुमार गायकवाड, नवी मुंबई अध्यक्ष राजेंद्र नवाळे सर ,नवी मुंबई महिला अध्यक्षा सौ.निता राऊत यांच्या सोबत कलासंचाक राजीव मिश्रा यांचे बरोबर विविध प्रलंबित विषयावर चर्चा झाली.महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ यापुढे देखील आपल्या प्रलंबित मागण्या यांचा पाठलाग सोडणार नाही. असा सज्जड इशारा देखील महासंघाने आज दिलेला आहे. यावेळी मुंबई विभागातील महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या पदाधिकारी यांच्या अडीअडचणी देखील समजून घेण्यात आल्या आहेत.

मुंबईला लवकरच एक शंकानिरसन बाबत महासंघाच्या वतीने एक दिवसाची कार्यशाळा घेण्याचा विचार आहे. covid-19 प्रादुर्भाव संपल्यावर नक्कीच त्यावर विचार केला जाणार आहे.असे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या प्रदेश कार्यकारणी च्या वतीने प्रदेश सरचिटणीस माननीय प्रल्हाद साळुंके यांनी सांगितले आहे.

अशी माहिती मोहन माने मुंबई विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ यांनी दिली.