श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय येडशी येथील कलाशिक्षक महमद इलाही बागवान यांना रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा, प्रतिष्ठान उदगीर, जि. लातूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

बार्शीतील मोहम्मद बागवान हे येडशी येथील जनता विद्यालय येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत असून ते फलक लेखन व व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत असतात. त्यांचे हे कार्य दिपस्तंभासारखे आहे. ते सतत कर्तव्यपूर्तीसह मानवहितास महत्व देऊन कार्य करत आहेत बागवान सर यांच्या उल्लेखनिय कार्याच्या गौरवार्थ त्यांना रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा, प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा रविवार दि . 10 एप्रिल रोजी दु . 12:35 रघुकुल मंगल कार्यालय, उदगीर येथे संपन्न होणार आहे.
More Stories
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन