Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > जनता विद्यालय येडशी येथील कलाशिक्षक मोहम्मद बागवान यांना ‘जागतिक सासंद आंतरराष्ट्रीय पुरस्कार

जनता विद्यालय येडशी येथील कलाशिक्षक मोहम्मद बागवान यांना ‘जागतिक सासंद आंतरराष्ट्रीय पुरस्कार

जनता विद्यालय येडशी येथील कलाशिक्षक मोहम्मद बागवान यांना ‘जागतिक सासंद आंतरराष्ट्रीय पुरस्कार
मित्राला शेअर करा

उस्मानाबाद : जनता विद्यालय येडशी येथील कलाशिक्षक मोहम्मद इलाही बागवान यांची ‘जागतिक सासंद आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. 3 डिसेंबर 2022.रोजी डब्ल्यू. सी. पी. ए. प्रेसिडेंट प्रा. डॉ. ग्लेन. टी. मार्टीन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आणि जागतिक सासंद आंतरराष्ट्रीय मध्ये मेंबरशिप ही मिळवली आहे.


कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आले. त्यांच्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल मोहम्मद बागवान श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ बी. वाय. यादव .उपाध्यक्ष श्री नंदनजी जगदाळे. सचिव पी. टी पाटील. उपसचिव डी बी देबडवार . खजिनदार जयकुमार शितोळे. सर्व कार्यकारणी व सदस्य. शाळेचे मुख्याध्यापक श्री रामा गाढवे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

   तसेच श्री मोहम्मद बागवान यांना फरीदाबाद दिल्ली येथे होनोररी डॉक्टरेक्ट अवार्ड कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान मिळत आहे व मॅजिक बुक रेकार्ड मध्ये नोंद झाली आहे. दि 9/12/2022 या तारखेस त्यांचा मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डर चे चेअरमन डॉ.सी.पी यादव यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.