पंढरपूर :- आषाढी शुध्द एकादशी सोहळा 10 जुलै 2022 रोजी असून, या सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून ते परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूर येत असतात.
पंढरपूरात येणाऱ्या भाविकांना तसेच पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे. अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.
आषाढी वारी सोहळा नियोजनाबाबत, सिंहगड इन्स्टिट्यूट, कोर्टी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव तसेच मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर उपस्थित होते
आषाढी वारी सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य, शौचालये, अखंडीत वीज पुरवठा, सुरक्षा या बाबींना प्राधान्य द्यावे. तसेच पायी वारीच्या प्रथा, परंपरा जपण्यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेले कामे प्राधान्याने पूर्ण करावित. वारी कालावधीत औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी.
तसेच पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी कोरोना लसिकरणाची केंद्राची स्थापना करावी. शहरात तसेच वारी कालावधीत चेंबर ओव्हर फ्लो होणार नाहीत याची दक्षता नगरपालिकेने घ्यावी या विषयावर चर्चा झाली.
पंढरपूरात आषाढी, कार्तिकी, माघी तसेच चैत्री या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरात येत असतात यासाठी पंढरपूर नगरपालिकेने शहराची लोकसंख्या व वारीसाठी येणारे वारकरी भाविकांची संख्या विचारात घेवून मलनिसारन प्रकल्पाची क्षमता वाढवावी यासाठी लागणारा आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच पालखी सोहळ्या सोबत दिवसें दिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने भाविकांच्या सुविधेसाठी शासकीय जमीनी अधिग्रहीत करण्याबाबत नियोजन करावे वारी निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी वारकरी भाविकांनी तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी केले.
वारीसाठी येणारे वारकरी भाविकांची संख्या विचारात घेवून नगरपालिकेने मलनिसारन प्रकल्पाची क्षमता वाढवावी तसेच भाविकांना मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ठिकठिकाणी नळ जोडणी करावी यावर उपाय योजना करण्यात येईल.
सरगम चौक पंढरपूर येथील रेल्वे क्रॉसिंग वरुन पालख्याचे रथ पार करताना प्रशासनाने दिलेल्या निश्चित वेळेतच पार करावीत. जेणेकरुन रेल्वे वाहतुकीस कोणतेही अडचन येणार नाही यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावर सोहळ्यास कोणतेही अडचण येणार याची दक्षता घेवून आवश्यक ठिकाणी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी गुरव यांनी प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे तसेच विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम