Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > एटीएम(A.T.M.) मध्ये कॅश उपलब्ध नसल्यास बँकांना भरावा लागेल दंड

एटीएम(A.T.M.) मध्ये कॅश उपलब्ध नसल्यास बँकांना भरावा लागेल दंड

मित्राला शेअर करा

अनेक वेळा आपल्याला एटीएम मध्ये कॅश (cash)काढण्यासाठी जातो आणि एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसते.एकाद्या वेळेला अडचणीच्या वेळी किंवा मेडिकल इमर्जन्सी च्या वेळी जर एटीएम मध्ये पैसे उपलब्धनसतील तर खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते

विषेशतः लाॅकडाऊन काळात atm मध्ये कॅश नाही या अडचणीला मोठया प्रमाणात सामोरे जावे लागले.

मात्र आता ग्राहकांना या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने सर्व बँका आणि एटीएम सेवा पुरविणाऱ्या ऑपरेटर्सना आता एटीएम मध्ये वेळेवर पैसे भरण्याचे निर्देश दिले आहे.जेणेकरून एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकांची गैरसोय होणार नाही व त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीही कमी होणार आहेत.यापुढे असे प्रकार घडले तर बँकांना दंड ठोठावला जाणार आहे.

आर बी आय ने असा निर्णय घेतला आला की बँका एटीएम मध्ये रोख रकमेचे उपलब्धतेवर लक्ष ठेवतील आणि कॅश काऊंटरवर जाणे टाळण्यासाठी वेळोवेळी वेळेवर भरपाई करण्यासाठी त्यांच्या यंत्रणा अधिक लक्ष देतील क,असे प्रभारी मुख्य व्यवस्थापक यांनी या आदेशात म्हटले.

सदर योजना 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणारआहे.या योजने नंतर एखाद्या बँकेच्या एटीएम (atm) मध्ये दहा तासांपेक्षा जास्त काळ कॅश उपलब्ध नसल्यास बँकांना 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.