ऑटो रिक्षा-टॅक्सी, विविध संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रति दिवस रु. ५०/- एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होते.

याबाबत, ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काबाबत निवेदने मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना देण्यात आले होते.
मोटार वाहन नियमामधील राज्य शासनास प्राप्त अधिकारांच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देणेसाठी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रति दिवस रु. ५०/- एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस स्थगिती देणेत येत आहे.
या निर्णयामुळे ऑटो रिक्षा-टॅक्सी, विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली