सोलापूर :- आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत “आयुष्मान वय वंदना” ही एक उप-योजना आहे जी 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व वरिष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना 29 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली असून, लाभार्थ्यांना वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा देते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.

योजनेद्वारे पुढील आजारांवर 5 लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात येतील.
- ENT (नाक, कान, घसा)
- Ophthalmology (नेत्रविकार)
- Orthopaedic & Polytrauma (अस्थिव्यंग आणि पॉलिट्रॉमा)
- Burns (भाजणे)
- Oncology Units (कर्करोग उपचार युनिट्स)
- Maintenance of Haemodialysis (Nephrology) Units (हिमोडायलिसिस – मूत्रपिंडशास्त्र युनिट्स)
योजनांचा उद्देश
(AB PM-JAY) : केंद्र सरकारची ही योजना देशभरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करते. यामध्ये 1 हजार 356 प्रकारच्या गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चाचा समावेश आहे.
MJPJAY: महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देते. यामध्ये 1 हजार 356 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे.
पात्रता:- 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती असो वा नसो; पूर्वी AB-PMJAY अंतर्गत असलेल्यांना अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळते.
आरोग्य सुरक्षा:-
- गंभीर आजारांसाठी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, कुटुंबातील इतर 70 पेक्षा जास्त सदस्यांसाठी स्वतंत्र कार्ड.
00000
दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे आरोग्यकवच; एकाच कार्डवर जनआरोग्य, आयुष्मान आता को-ब्रँडेड कार्ड मिळणार सोलापुरात.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत को-ब्रँडेड कार्ड तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्यकवच उपलब्ध होते. राष्ट्रीय स्तरावरील ओळखपत्र म्हणजेच को-ब्रँडेड कार्ड देण्यासाठी आता विशेष मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सन 2018 मध्ये सुरू झालेले हे हेल्थ कार्ड धारकांना सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील हजारो सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळवून देते.
योजनेद्वारे करण्यात येणारे मोफत उपचार
हृदयविकार, कर्करोग, न्यूरोलॉजिकल आजार, किडनी आणि युरिनरी समस्या, यकृत रोग आणि श्वासोच्छ्वासाशी संबंधित गंभीर आजारांवर उपचार मिळतात. या योजनेत पोर्टेबिलिटीचा लाभ मिळतो, म्हणजे लाभार्थी आपल्या गृहराज्यात किंवा इतर कोणत्याही राज्यात उपचार घेऊ शकतो.
5 लाखांचा मोफत उपचार काय सांगते आकडेवारी… 40 लाख जणांनी अंदाजे आतापर्यंत नोंदणी केली. 14.58 लाख जणांनी आतापर्यंत को-ब्रँडेड कार्ड काढले.
मदत-को-ब्रँडेड कार्ड काढण्यासाठी आरोग्य विभागाकडून संस्था, संघटना व स्थानिक लोकांची मदत घेतली जात आहे. शिवाय लोकप्रतिनिधींना विशेष शिबीराचे आयोजन करण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात येत आहे. जिल्ह्यात 2 हजार 891 आशा वर्कर, 94 आरोग्य मित्र व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस यांचीही मोठी मदत लाभत आहे.
को-ब्रँडेड कार्ड म्हणजे काय?-
को-ब्रँडेड कार्ड हे एक असे आरोग्य कार्ड आहे जे केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना आणि राज्य सरकारची आरोग्य योजना यांना एकत्रित करते. यामुळे, लाभार्थी एकाच कार्डचा वापर करून दोन्ही योजनांच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात.
थेट मोबाईलवर मिळतेय कार्ड को-ब्रँडेड कार्डची नोंदणी केल्यानंतर त्यास मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर को-ब्रँडेड कार्ड मिळते. मोबाईलवर कार्ड मिळाल्यानंतर अवघ्या दोन तासात ते कार्ड सक्रीय होते. याचा लाभ उपचारासाठी घेण्यात येतो.
चौकट-
सध्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना को-ब्रँडेड कार्ड देण्यात येत आहे. 30 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील उर्वरित 26 लाख लोकांचे को-ब्रँडेड कार्ड काढण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. शिवाय स्माईल, नमस्ते योजनेच्या लोकांनाही हे कार्ड देण्यात येत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक,
डॉ. वर्षा डोईफोडे
*
More Stories
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
आई, संत, भगवंत ही तीन माणसे सोडली तर या जगात सगळी माणस स्वार्थी आहेत ह.भ.प. इंदोरीकर महाराज
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर