Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमातील योगदानाबद्दल राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमातील योगदानाबद्दल राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

मित्राला शेअर करा

दि. 22 डिसेंबर 2021 रोजी बार्शी न्यायालय परिसरात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमात आपले योगदान दिल्याबद्दल राजर्षी शाहू विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

न्यायाधीश महोदय जगदाळे साहेब, न्या. भस्मे साहेब, न्या. संधू साहेब, न्या. धडके साहेब, न्या. पठाण साहेब आदी न्यायाधीश महोदय यांच्याहस्ते हा सत्कार विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

बार्शीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, तहसीलदार, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील मॅडम, परांडा, पांगरी, वैराग व बार्शी चे पोलिस निरीक्षक,वकील संघाचे सर्वपदाधिकारी, विधीज्ञ आदी आदी मान्यवरांच्या उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.

राजर्षी शाहू विधी महाविद्यालयातील मधील स्नेहा शिवाजी निंबाळकर, कांचन महेश क्षीरसागर, कर्णराज धर्मराज जाधव, विजय सुरेश काकडे,राहुल संजय मिरगणे, केदार सुशीलकुमार पाटील, पप्पू जालिंदर थोरात, सूरज परमेश्वर वणवे, प्रवीण हरिदास डिसले, सागर मिलिंद ब्रम्हे, रामेश्वर वसंत व्यवहारे, शुभम सतीश पालके, अरफात कामिल शेख, सागर शालन पवार, बिभीषण ब्रह्मदेव अंधारे, निसार कासीम जहागीरदार, गणेश मोहन चव्हाण, सोमेश योगीराज थोरात,सागर माणिक पाटील या विद्यार्थ्यांचा तसेच काॅलेजचे प्राचार्य गाढवे सर, ॲड.खोत सर व इतर शिक्षकवर्ग यांचा कौतुक सत्कार करण्यात आला.

यावेळी काॅलेजतर्फ स्नेहा निंबाळकर हिने कार्याचे रेकॉर्ड प्राचार्य शिक्षक व विधीचे विद्यार्थी यांच्याहस्ते माननीय न्यायाधीश महोदय जगदाळे साहेब व न्यायाधीश महोदय भस्मे साहेब यांना सुपूर्द केले. यावेळी या महाराष्ट्र विद्यालय व सुलाखे हायस्कूल येथील शिक्षक आदी उपस्थित होते.

स्नेहा निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांनचे आभार मानले कार्यक्रमाचे सुञसंचालन अँड. विक्रम सावळे यांनी केले.