Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > व्हिडीओ > बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केलेला संकल्प आदर्शवत व कौतुकास्पद – रणवीर राऊत, सभापती बाजार समिती

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केलेला संकल्प आदर्शवत व कौतुकास्पद – रणवीर राऊत, सभापती बाजार समिती

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केलेला संकल्प आदर्शवत व कौतुकास्पद - रणवीर राऊत, सभापती बाजार समिती
मित्राला शेअर करा

कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 15 /8/ 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त व बाजार समितीचे स्थापनेस 75 वर्षेपूर्ती निमित्त बाजार समिती असणाऱ्या शासकीय सुट्ट्या, दुसरा शनिवार, चौथा शनिवार व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बाजार आवारामध्ये येणाऱ्या शेतकरी व बाजार समितीतील घटक यांची सोय होणार आहे.

देशासाठी अन्नधान्य पिकवणाऱ्या बळीराजाला कधीही सुट्टी नसते तसेच देशाचे रक्षण करणारे सीमेवरील जवान 24 तास कार्यरत असतात बाजार समिती ही संपूर्ण ही बळीराजाची आहे. बळीराजाची गैरसोय टाळण्यासाठी व शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महापुरुषांच्या जयंती निमितीचे सुट्टी दिवशी कार्यालय सुरू ठेवून जास्तीचे काम करून खरी आदरांजली देण्याचा निर्णय सर्व कर्मचारी बांधवांनी घेतला आहे.

ज्या ज्या महापुरुषांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी व देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी दिवस-रात्र अविरतपणे सेवा केली, त्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, जास्तीत जास्त काम करून त्यांना खरी आदरांजली वाहण्यात येईल.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त व बाजार समितीच्या स्थापनेस 75 वर्षे पूर्ण होत असल्याने जास्तीत जास्त देशासाठी काम करणारे करणे गरजेचे आहे . त्यामुळे सार्वजनिक सुट्ट्यांचा वापर कामकाजात आणणे हीच खरी देश सेवा आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व बाजार समितीच्या स्थापनेस 75 वर्षे पूर्ण झाल्याने आम्हीं खालील सह्या करणारे सर्व कर्मचारीवृंद यांनी वरील निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे निवेदन बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे व सर्व कार्यालयीन कर्मचारी वर्गाने बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत व संचालक रावसाहेब मनगिरे यांना दिले.