Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बँकेची घोडदौड, शिवशक्ती बँकेच्या संचालक मंडळाचा खुलासा

बँकेची घोडदौड, शिवशक्ती बँकेच्या संचालक मंडळाचा खुलासा

मित्राला शेअर करा

भगवंतनगरी कर्मवीर मामासाहेबांच्या विचाराचा वारसा जोपासणारी शीवशक्ती अर्बन को-ऑपरेटिव्ह बैंक लि. बार्शी हि सोलापूर व उस्मानाबाद जिल्हा अशी कार्यक्षेत्र असणारी बहुजन सर्वसामान्य शेतकरी व्यावसायिकांची बँक आहे दि. ३० / १२ / १९९८ रोजी श्री शिवाजीराव कांबळे व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने स्थापन झालेली आहे.

ठेवींवरती चांगल्या प्रकारचे व्याजदर देते तसेच अल्पवधीत कर्ज वाटप करण्यासाठी नावलौकिक असणारी बँक आहे तसेच मागील २३ वर्षापासून कार्यरत असणारी बैंक आहे. रिझर्व्ह बॅंकेचे पूर्ण क्षमतेने सर्व निकष उत्तमपणे जोपासणारी एकमेव बँक आहे. बँकेत असणाऱ्या सर्व ठेवी या सर्वसामान्य गोरगरीब तसेच संस्थेच्या कर्मचारी खातेदारांच्या आहेत तसेच DICGC कडे बँक विमा हफ्ता नियमित भरत आहे. बँकेस २२ वर्षाच्या कालावधीत ११ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

नोव्हेंबर २०२१ अखेरची आर्थिक स्थिती
१) सभासद संख्या ३९०९
२ ) राखीव निधी १३.२९ कोटी गुंतवणूक ६८.९० कोटी
३ ) ठेवी १७२.३७ कोटी कर्जे ११४ इतर येणे ४.०९ कोटी
४ ) नफा ३.०७ कोटी
५) खेळते भांडवल २००.४८ कोटी
CRAR – १३.३६ % NPA -६.८ ( मार्च २०२१ अखेर कोरोना काळातही )

चालू वर्षी लाभांश वाटप १० %
मागील १८ वर्षापासून नियमित लाभांश वाटप करण्यात आला आहे.

ऑडिट वर्ग सतत सतत अ राखण्यात यश

मागील २२ वर्षापासून रिझर्व्ह बॅंक बँकेची ऑडिट वर्गवारी उत्तम आहे तसेच वाशी उस्मानाबाद व गांधीनगर बार्शी येथे शाखेचा प्रस्ताव पाठविले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे स्वमालकीची इमारत आहे बॅंकेने सर्व कागदपत्रे वाटप केलेले आहे. बँकेने कुठल्याही प्रकारच्या अनियमितेने कर्ज वाटप केलेले नाही ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण काही लोक गैरसमजुतीने सोशल मीडियाद्वारे पसरवत आहेत. बँक उत्तम स्थितीत आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्या सर्व ठेवी सुरक्षित आहेत असा खुलासा शिवशक्ती बँकेच्या संचालक मंडळाकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

यावेळी शिवशक्ती बँकेचे चेअरमन डाॅ. प्रकाश बुरगुटे, व्हाईस चेअरमन सुभाष जगदाळे, पालक संचालक डॉ. बी. वाय. यादव सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.