बार्शी : विमा व्यवसायातील जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा समजला जाणारा MDRT-COT हा सन्मान बार्शीतील लोकमतचे पत्रकार शहाजी फुरडे पाटील यांना मिळाला आहे. शहाजी फुरडे-पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी टाटा कंपनीच्या इन्शुरन्स क्षेत्रातील सर्वोच्च MDRT-COT (Court Of Table) हे मानांकन मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

शहाजी फुरडे हे बार्शी शहरात धनसंपदा वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून विमा आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीची सेवात देतात. त्याच माध्यमातून टाटा लाइफ इन्शुरन्समध्ये 2024 मध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक विमा व्यवसाय करत एका वर्षात 4 वेळा MDRT म्हणजेच COT मानांकन मिळवले. तर, यंदा सहा महिन्याच्या आतच स्वतः आणि मुलगा मालोजी शहाजी फुरडे-पाटील यांनी ही MDRT चा मान मिळवण्याचा नवा विक्रम केला आहे.
मागील आठवड्यात दनांग (व्हिएतनाम) शहरात, फुरडे-पाटील यांचा Tata लाईफचे राष्ट्रीय हेड राकेश शर्मा आणि अमित दवे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याशिवाय हैदराबाद येथे झालेल्या कंपनीच्या स्ट्रॅटेजी मिट मध्ये देखील त्यांना गौरविण्यात आले. यंदाच्या MDRT डिक्लेरेशननंतर सोलापूर ब्रँच हेड यतीराज माने, सहा. शाखाधिकारी ज्ञानेश्वर पाटील, लीडर गोपी चिलेवरी यांनी सर रतन टाटा यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. याशिवाय टाटा लाइफचे महाराष्ट्र प्रमुख दीपक फडणीस, पुणे क्लस्टर हेड रमेश पांचाळ, झोनल हेड प्रवीण पाटील, सोलापूर ब्रँच हेड, श्याम आरगडे, ट्रेनर अश्विनी राजमाने, पायल कामतकर, शिवाजी कोल्हे आणि टाटा परिवारातील सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
More Stories
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार
बार्शीकर धावले नांदेडमधील पूरग्रस्तांच्या मदतीला, पीडित कुटूंबियांना मदत