बार्शी – राज्यात कुठेही निसर्गिक अप्पति येओ बार्शीकर नेहमीच मदतीसाठी पुढे येत असतात, महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील रावणगाव (भा) येथील गावास पुराचा जबरदस्त फटका बसला. या गावातील 271 नागरिकांना गावातून सुमारे तीन किलोमीटर पाण्यातून रेस्क्यू करण्यात आले पूरग्रस्त नागरिकांना तात्पुरते निवारा शेड उभारून ठेवण्यात आले आहे. या कॅम्पमधील कुंटबियाना बार्शी तहसीलदार एफ.आर.शेख,व रेडक्रॉस सेक्रेटरी अजित कुंकूलोळ, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने मदत करण्याचे ठरविले.

तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यासह रेडक्रॉस सदस्य पञकार संतोष सुर्यवंशी, प्रशांत बुडूख, उमेश देशमाने व राहूल कुंभार यांनी गावातील पूरग्रस्त पीडित कुटुंबीयांना बार्शी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने संसार उपयोगी गरजेच्या वस्तू, साहित्य किचन सेट, चटई, बेडशीट, साडी, जर्किन, बादली, रस्सी, हॅन्ड वॉश, मेणबत्ती पाकीटे व गोडे तेल पाकीट वाटप कॅम्पमध्ये जाऊन केले.
बार्शी तिथं सरशी हे आपण अनेकदा पाहिलं आहे, बार्शीमध्ये तो सेवाभाव आणि मदतीचा हात देण्याची वृत्ती अंगीकृत आहे. त्याच सेवा भावनेतून बार्शीतील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्यावतीने पूरग्रस्त पीडितांना मदतीचा हात देण्यात आला.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल