Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात वेगळेपण जपले; वर्षाताई ठोंबरे

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात वेगळेपण जपले; वर्षाताई ठोंबरे

मित्राला शेअर करा

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मुख्य बाजार आवारात १० लाख रुपये खर्चून नव्याने बसविण्यात आलेले ६८ सीसीटीव्ही कॅमेरे व १० लाख रुपये खर्चून तोलार व वारणी कामगार बांधवांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या निवारा शेडच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मुख्य बाजार आवारात नवीन ६८ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तोलार व वारणी कामगार बांधवांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे लोकार्पण बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई ठोंबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या लोकार्पण प्रसंगी त्यांनी तीन वर्षांपूर्वी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झालेल्या बाजार समितीचा कारभाराचा संपूर्ण आढावा घेतला. आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने या तीन वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. यामध्ये मुख्य बाजार समिती आवारातील रस्ते डांबरीकरण, गटारी, दिवाबत्ती, पाण्याची सोय, नव्याने बांधण्यात आलेले व्यापारी गाळे, कोल्ड स्टोरेज, त्याचप्रमाणे ओपन जिम व या आवारात लावण्यात आलेल्या वृक्षारोपणाची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती त्यांनी घेतली.

त्याचबरोबर बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सौरूउर्जा प्रकल्पास भेट देऊन त्याचीही पाहणी केली.

संपूर्ण महाराष्ट्रात बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या अंतर्गत असलेल्या बाबींचा विकास अतिशय चांगल्या प्रकारे व वैविध्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून करून त्यासाठी बार्शी बाजार समितीने आपले एक वेगळे पण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

बाजार समितीची पाहणी करताना त्यांनी बाजार समितीतील प्रत्येक घटकाची माहिती घेतली. बाजार समितीच्या सेसच्या माध्यमातून वाढलेला उत्पन्नाचा आलेख हा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

त्याचबरोबर बाजार समितीचा व्यापाराचा असलेला लौकिक व विश्वास आडते, खरेदीदार, व्यापारी यांनी चांगल्या प्रकारे टिकविला आहे त्याबद्दलही त्यांनी त्यांचे कौतुक केले.

बाजार समितीचे घटक असलेला अडत्या, व्यापारी, खरिददार, हमाल, तोलार, वारणी कामगार, मुनीम आदींबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांनी बाजार समितीचा कारभार हा चेअरमन रणवीर राऊत, रावसाहेब मनगिरे मालक व संपूर्ण संचालक मंडळाच्या निगराणीखाली अतिशय उत्तम प्रकारे सुरू असल्याची शाबासकी त्यांनी चेअरमन व त्यांच्या संचालक मंडळात दिली.

याप्रसंगी जेष्ठ व्यापारी रविदादा बुडूख, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले, उपाध्यक्ष दिलीप शेठ गांधी, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, शिवशंकर बगले, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक, चंद्रकांत मांजरे, सचिव तुकाराम जगदाळे, वालचंद बप्पा मुंढे, तुकाराम माने, दामोदर काळदाते, सचिन मडके आदी उपस्थित होते.