बार्शी : कोणत्याही शहराचे वैभव हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातूनच होते. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा आदर्श मोठा असून हाच आदर्श आपण घेऊ. एखाद्या जिल्ह्याला लाजवेल अशीही बाजार समिती असल्याचा गौरव यावेळी त्यांनी केला.
तालुक्याच्या दृष्टीने बाजार समितीचे कार्यही अभिमानाची गोष्ट आहे. बार्शीने नेहमीच आपल्याला साथ दिल्याने आपणही बार्शीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज दिली.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने महावीर स्वामी भगवान व्यापारी संकुल, भगवान श्री आदिनाथ तीर्थंकर व्यापारी संकुल, 50 लाख रुपये खर्चून तयार केलेला सौरऊर्जा प्रकल्प या कामाचे उद्घाटन आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बाजार समिती आवार लातूर रोड येथे दिगंबर वासुदेव नारकर शीतगृह बांधणे, शेतकरी निवास बांधणे, जनावर बाजारासाठी निवारा शेड बांधणे, अशा विविध नियोजित कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
खा. निंबाळकर म्हणाले, उस्मानाबाद जिल्हा असतानाही तेथील बाजार समितीपेक्षा बार्शी बाजार समितीचे कार्य उल्लेखनीय आहे. या बाजार समितीचा आदर्श घेऊन येथील आ. राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उस्मानाबाद उत्पन्न बाजार समितीमध्ये कायापालट कायापालट करू. टेंभुर्णी पासून उस्मानाबाद तुळजापूर पर्यंत रस्त्याचा प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन ही निंबाळकर यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमास यावेळी माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वासराव बारबोले, रमेश पाटील, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, वैरागचे डॉ. कपिल कोरके, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, उपसभापती झुंबर जाधव, सचिव टि. ए. जगदाळे, संचालक रावसाहेब मनगिरे, साहेब कोंडारे, चंद्रकांत मांजरे, महादेव चोरघडे, साहेबराव देशमुख, अनिल जाधव, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक विजय राऊत, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले अडते, व्यापारी यांच्यासह सर्व नगरसेवक जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते.
आ. राजेंद्र राऊत यांनी बाजार समितीचे काम करत असताना येथील व्यापारांना विश्वास देण्याचे काम करणे गरजेचे आहे, असे सांगितले. आ. राऊत म्हणाले, एक हजार कोटीचा सोयाबीनवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प बार्शीत लवकरच होत आहे. बार्शी बाजार समिती बरोबरच शहर आणि तालुक्यातही विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास बेकारी कमी होईल. त्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे, आमदार राऊत यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री आमदार विजय देशमुख पंढरपूरचे विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनीही बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्याचे कौतुक केले.
बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी आपल्या भाषणातून मागील तीन वर्षात कोट्यावधी रुपयांचा विकास केल्याचे सांगितले. ते म्हणाले, बार्शी बाजार समितीने सुमारे अठरा कोटी रुपये खर्चून डांबरी रस्ते, उद्यान, व्यायाम शाळा, वृक्षारोपण, 96 के व्ही चा सौर ऊर्जा प्रकल्प ही कामे केल्याचे सांगितले. विरोधी सदस्य असतानाही खेळीमेळीच्या वातावरणात बाजार समितीचा विकास करत असल्याचे राऊत यांनी यावेळी बोलून दाखवले. विरोधी गटाने कितीही तक्रारी केल्या तरी बाजार समितीत एक पैशाचाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या तक्रारीनुसार लेखापरीक्षणातही बार्शी बाजार समिती उत्कृष्ट असल्याचा दाखला अनेक लेखापरीक्षकांनी दिल्याचे यावेळी सभापती राऊत यांनी सांगितले.
Nice??????