बार्शी बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी ॲड. अविनाश जाधव यांची निवड

वकिलांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जाणारी बार असोसिएशन निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले यात सन २०२१-२२ च्या बार्शी बार असोसिएशन वार्षिक निवडणुकीत ॲड. अविनाश हौसेराव जाधव यांची अध्यक्षपदी निवड झाली असून ते 12 मतांनी विजयी झाले आहेत तर उपाध्यक्ष पदी ॲड शाम झालटे यांचे ज्युनिअर भगवंत शिवाजीराव पाटील हे 34 मते मिळवून विजयी झाले. आहेत तसेच सचिव पदी ॲड. नरेंद्र मधुकर घोडके यांची निवड झाली आहे व ते 86 मते मिळवत सचिव पदी निवडून आले आहेत.

खजिनदार, लायब्ररी चेअरमन, मॅनेजमेंट कमिटी या निवडी बिनविरोध झाल्या आहेत यामध्ये खजिनदार पदी ॲड.अनंत अप्पाराव मस्के लायब्ररी चेअरमन पदी ॲड. अविनाश कोंडीबा गायकवाड यांची निवड झाली.
तर मॅनेजिंग कमिटी सदस्यपदी ॲड. अक्षय बिडबाग,ॲड. धीरज कांबळे, ॲड. उषा पवार,ॲड. संजय गुंड यांची निवड झाली आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले