शहर व तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे अणि यासाठी उद्योगधंदे उभा करणे गरजेचे आहे हे ओळखून आमदार राऊत सतत प्रयत्न करताना दिसतात याचाच एक भाग म्हणून राजेंद्र राऊत आणि शिष्टमंडळाने सोनई उद्योग समूहास पाहणीसाठी भेट दिली.
संपूर्ण भारत देशात अल्पावधीत नांव लौकिक मिळविलेले उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रगण्य नांव म्हणजे सोनाई दुध होय. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील आदरणीय दशरथ उर्फ दादासाहेब माने यांच्या सोनाई उद्योग समूहास बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील ४० व्यापारी बांधवांच्या ( अडते, खरेदीदार ) शिष्टमंडळ समवेत सोनाई उद्योग समूहातील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सोनाई एडिबल ऑईल प्रकल्प तसेच सोनाई दुध, सोनाई पशू आहार या प्रकल्पांना आमदार राजाभाऊ राऊत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
या उद्योग समूहास भेट देत असताना सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय दशरथ उर्फ दादासाहेब माने, पुणे जिल्हा परिषद सदस्य व सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रविण भैय्या माने यांनी आमदार राजाभाऊ राऊत व शिष्टमंडळासोबत व्यापार व उद्योग क्षेत्रातील अनेक विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दादासाहेब माने यांनी बार्शी बाजार पेठेसोबतच्या त्यांच्या जुन्या संबंधांच्या आठवणींना उजाळा देत, बार्शी तालुक्यातील व्यापारी बांधवांना उद्योग व्यवसायाशी निगडित गोष्टींशी पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्यात अशाच प्रकारे व्यापारी बांधवांनी नव-नवीन उद्योग उभे करून तालुक्याच्या अर्थकरण वाढीस मदत करावी व बार्शी बाजार पेठेस पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी अपेक्षा मी व्यक्त केली. अशाप्रकारे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आदरणीय व्यक्तींचे आदर्श, मार्गदर्शन, सल्ला घेऊन आपणही बार्शी तालुक्याला अर्थचक्र वाढविण्यासाठी मदत कराल व तालुक्यातील सुशिक्षित तरुण बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, त्याचप्रमाणे शेतीपूरक व्यवसायाशी निगडीत असलेल्या अशा उद्योग समूहांमुळे शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतीमालाला चांगल्या प्रकारे नक्कीच भाव मिळेल अशीही भावनाही त्यांनी व्यक्त केली.
या वेळी बार्शी बाजार पेठेस व उद्योगांस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या सोबतीने संपूर्ण सहकार्य करणार असा शब्द दशरथ उर्फ दादासाहेब माने, सोनाई उद्योग समूह इंदापूर यांनी दिला.
या शिष्टमंडळात मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले, उपाध्यक्ष दिलीप शेठ गांधी, माजी नगरसेवक महेश शेठ बाफना, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, टेंभुर्णीचे कोठारी शेठ, भरतेश गांधी, सचिन बागमार, विकास धारूरकर, दामोदर काळदाते, संतोष बोराडे, अरविंद गांधी, धनंजय घोलप, अनिल गायकवाड, प्रविण वखारिया, राहूल शिंदे, निलेख वखारिया, गोविंद बाफना आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान