सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाअंतर्गत “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबवून जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून तिरंग्याची ” आण बाण शान” या संकल्पनेने दिनांक २७/ ७ /२२ रोजी बार्शी उपविभागात पथसंचलन, पथनाटय, कार्यक्रमाचे शांततेत संपन्न झाला. सदर “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विद्यालयातील ९ वी या वर्गातील विद्यार्थीनी, विदयार्थी व शिक्षक वृंद यांनी सहभाग घेवून राष्ट्रीय कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रध्वज व राष्ट्रभक्तीची जाणिव निर्माण व्हावी या हेतूने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे.
या सहभागाबद्दल महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे शहर पोलीस ठाणे यांनी आभार मानले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ