बार्शी – पत्रकारितेच्या बदललेल्या माध्यमात आज डिजिटल पत्रकारिता सर्वात गतीमान बनली आहे. कोरोना कालावधीत डिजिटल पत्रकारितेनं वेग घेतला. याच दरम्यान, महाराष्ट्रातील पहिली डिजिटल मीडिया संघटना ज्येष्ठ पत्रकार राजा माने साहेब यांच्या नेतृत्त्वात, संस्थापक अध्यक्ष म्हणून स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या बार्शी कार्यकारिणीची फेरनिवड झाली. त्यामध्ये, बार्शी टाइम्सचे दिनेश मेटकरी यांना अध्यक्ष तर सचिव हिंदवी समाचारचे धीरज शेळके तर, उपाध्यक्ष स्टार वन न्यूजचे अमीन गोरे व खजीनदार पदी स्वामिनी न्यूजचे विक्रांत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

डिजिटल मीडिया संपादक संघटनेच्या बार्शी कार्यकारिणीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नव्याने कार्यकारिणी जाहीर झाली. विजेता टाइम्सचे अजय (टिंकू) पाटील यांनी दोन वर्षे अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता नवीन कार्यकारिणी बिनविरोधपणे निवड केली. बार्शीतील वरिष्ठ पत्रकारांच्याहस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार संतोष सूर्यवंशी व पत्रकार संजय बारबोले यांच्याहस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान झाला. यावेळी, संतोष सूर्यवंशी यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. मावळते अध्यक्ष पाटील यांनी गत २ वर्षातील कामाची उजळणी करत नूतन अध्यक्षांकडे पदभार सुपूर्द केला. तर, नुतन अध्यक्ष मेटकरी यांनी सर्वांना सोबत घेऊन संघटनेची वाटचाल अधिक गतीमान करण्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, सत्कार समारंभप्रसंगी धीरज शेळके यांनी प्रास्ताविक केले. तर, मेटकरी यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष अजय पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
राज्य कार्यकारिणी सदस्य – संतोष सूर्यवंशी
जिल्हा उपाध्यक्ष – विजय कोरे
जिल्हा सरचिटणीस – विनोद ननवरे
मानद सल्लागार – मयूर गलांडे
नूतन पदाधिकारी निवड
बार्शी तालुका अध्यक्ष – दिनेश मेटकरी
बार्शी तालुका उपाध्यक्ष – अमीन गोरे
बार्शी तालुका सचिव – धीरज शेळके बार्शी तालुका
खजिनदारपदी – विक्रांत पवार
कार्यकारिणी सदस्य
रमण करंजकर, अजय पाटील, भैरवनाथ चौधरी, निलेश उबाळे, विकी गोंदकर व मान्यवर उपस्थित होते.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक