Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > बार्शी नगरपरीषद पथविक्रेता समिती निवडणूक बिनविरोध, आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या शुभेच्छा

बार्शी नगरपरीषद पथविक्रेता समिती निवडणूक बिनविरोध, आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या शुभेच्छा

बार्शी नगरपरीषद पथविक्रेता समिती निवडणूक बिनविरोध, आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या शुभेच्छा
मित्राला शेअर करा

बार्शी नगरपरीषद मार्फत नगर पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ मधील बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा आमदार राजेंद्र राऊत यांनी सत्कार करून सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र पथ विक्रेता सन २०१६ नुसार राज्यात पथ विक्रेता धोरण राबविण्याबाबत बार्शी नगरपरीषद मार्फत नगर पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ राबविली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून. बा.न.पा. मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती, सदरील निवडणूकीत एकूण ९५७ मतदारापैकी ११ उमेदवरांचे अर्ज भरले होते,त्यापैकी अर्ज ४ बाद झाले व ०७ उमेदवरांची अर्ज मंजूर झाले होते व अनु जमाती (महिला) या प्रवर्गातून कोणताही अर्ज प्राप्त झाला नाही.

सदरील निवडणूकीत सर्वसाधारण पुरुष गटातून अलीशर इब्राहीम बागवान, हेमंत विनायक शाहीर, दिव्यांग पुरुष प्रवर्गातून दादाराव गणपत गायकवाड, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आरती विनोद कदम,अनुसूचित जाती प्रवर्गातून मंगल लहू शिंदे,इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गातून राजूबाई लक्ष्मण ढगे,अल्पसंख्याक महिला प्रवर्गातून मन्नाबी सारावर बागवान यांची बिनविरोध निवड झाली तसेच अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून कोणताही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे ती जागा रिक्त ठेवण्यात आली.

यावेळी महादेव बोकेफोडे, अजय (बप्पा) जगताप यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.