Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शी शहराच्या व विस्तारित भागातील विकास कामांकरिता १२ कोटी ९६ लाखांचा निधी – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी शहराच्या व विस्तारित भागातील विकास कामांकरिता १२ कोटी ९६ लाखांचा निधी – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी शहराच्या व विस्तारित भागातील विकास कामांकरिता १२ कोटी ९६ लाखांचा निधी - आमदार राजेंद्र राऊत
मित्राला शेअर करा

बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून बार्शी शहराच्या व विस्तारित भागातील नागरिकांकरिता नागरी दळणवळण विकास अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण करणे, रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, आरसीसी गटारी बांधणे आदी कामांकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून १२ कोटी ९६ लाख ९२ हजार ५०१ रुपयांच्या प्रस्तावित कामांकरिता निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

मागील पाच वर्षांच्या काळात आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी नगरपरिषदेने बार्शी शहराचा व विस्तारित भागाचा सर्वांगीण विकास करताना शेकडो कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत गरजा रस्ते, गटारी, भूयारी गटार योजना, आरोग्य स्वच्छता, नळ जोडणी, दिवाबत्ती, बाग-बगीच्यांची दुरुस्ती व नवीन निर्माण, त्याचप्रमाणे व्यापारी संकुले आदींच्या माध्यमातून विकासकामे केली.

बार्शी शहराचा वाढता विस्तार व हद्दवाढ भागाची गरज लक्षात घेता आमदार राजेंद्र राऊत नेहमी बार्शीकरांना नागरी सुविधा देण्याकरिता तत्पर व कटीबद्ध आहेत. याचाच एक भाग म्हणून बार्शी शहरातील १२ प्रभाग व तेथील विस्तारित भागांकरिता सदरचा निधी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपरिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतला आहे. यामध्ये सुभाष नगर परिसर व विस्तारित भाग, ताडसौंदणे रोड परिसर व विस्तारित भाग, पंकज नगर परिसर, परंडा रोड परिसर व विस्तारित भाग, अलीपुर रोड परिसर व विस्तारित भाग, उपळाई रोड परिसर व विस्तारित भाग त्याचबरोबर कासारवाडी रोड परिसर व विस्तारित भाग, कुर्डूवाडी रोड परिसर, ढगे मळा, बारबोले प्लॉट, शिवशक्ती मैदान या परिसरातील प्रभाग क्रमांक १,२,३,७,११,१४,१५,१६,१७,१८,१९,२० यांचा समावेश आहे.

लवकरच या कामांची निविदा प्रसिद्ध होवून, त्या प्रक्रीये नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.