बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित बार्शी प्रिमियर लीगचा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते संपन्न व स्पर्धेला सुरुवात

बार्शी: बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित बार्शी प्रिमियर लीग चे उद्घाटन व जर्सीचे उद्घाटन कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण देशमुख यांनी केले.
बार्शी प्रिमियर लीग चे उद्घाटन व जर्सी चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते करण्यात आले. बार्शी प्रिमियर लीग मधे सहभागी होणाऱ्या टीम चे प्रायोजक विशाल बागल, सतीश आंधारे आणि राजाभाऊ देशमुख यांनी आपल्या टीमला जर्सी दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीरंग कापसे व अमित पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
अविनाश सोलवट यांनी आपले मार्गदर्शन करताना वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल खेळाडूंना सांगितले.या स्पर्धेचे तिन्ही प्रायोजक यांनी येथून पुढील प्रत्येक स्पर्धेला प्रायोजन करण्याचे ग्वाही दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक कर्नेवाल यांनी फिटनेस याबद्दल खेळाडूंना सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वप्निल आंधारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन चे सर्व कोच आणि खेळाडू यांनी परिश्रम घेतले.
बार्शी सारख्या छोट्या शहरात बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुरू झालेले क्रिकेटचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण, किंवा बार्शी प्रिमियर लीग सारखे सामने याचा फायदा राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
More Stories
यशवंत विद्यालय खांडवी ता. बार्शी तील विद्यार्थ्यांची विधानभवनाला अभ्यास भेट, लोकशाहीच्या कार्यप्रणालीचा घेतला अनुभव
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे