Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे पाच खेळाडूना IPL स्पर्धा पाहण्याची संधी

बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे पाच खेळाडूना IPL स्पर्धा पाहण्याची संधी

बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे पाच खेळाडूना IPL स्पर्धा पाहण्याची संधी
मित्राला शेअर करा

बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन चे संचालक तथा मार्गदर्शक अविनाश दादा सोलवट(पी एस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या संकल्पनेतून BTCA च्या पाच खेळाडूना वानखेडे स्टेडियम मुबई येथे दिनांक 22/05/2022 रोजी पंजाब आणि हैद्राबाद यांच्या दरम्यान होणारा सामना पाहण्याची संधी मुंबईचे श्रीजी फार्मा कंपनीचे मालक तसेच डायरेक्टर, गरवारे क्लब हाऊस वानखेडे स्टेडियम, मुंबई मा श्री जनक गांधी यांनी BTCA च्या पाच खेळाडूंना मोफत सामना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन तर्फे त्यांचे आभार मानले.

तसेच अविनाश दादा सोलवट साहेब यांनी पुढील काळात होणाऱ्या IPL च्या स्पर्धा किंवा आंतराष्ट्रीय एकदिवसीय अथवा पाच दिवसीय टेस्ट सामने होतील त्यांची प्रत्येकी चार ते पाच तिकीट BTCA च्या नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंना उपलब्ध करून दिली जातील अशी घोषणा केली. त्यांच्या मते याचा फायदा खेळाडूंना मोठया प्रमाणात होणार आहे. प्रत्यक्ष सामना पाहिल्या नंतर BTCA च्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रमाणे अनुकरण करता येईल.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंना समोर पाहताना आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढीस लागेल या भावनेने पुढील काळात BTCA नियमित (रेग्युलर) खेळाडूंना अनेक आंतरराष्ट्रीय सामन्याची तिकिटे उपलब्ध करून दिली जातील. त्याबद्दल बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी असे मत व्यक्त केले की भविष्यात BTCA च्या माध्यमातून भारताला अनेक उत्कृष्ट खेळाडू मिळतील. त्याच स्वप्नाचा पाठपुरावा करताना BTCA अशा संधी प्रत्येक वेळी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली.

बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचें सचिव प्रा. किरण देशमुख यांनी मा. अविनाश सोलवाट साहेब आणि मा. जनक गांधी साहेब तसेच मा. संतोष काका ठोंबरे यांचे आभार मानले.