बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडाच्या प्रकार होऊन मालाविषयी गुन्हे घडणार नाहीत या करिता मा. पोलीस अधीक्षक मॅडम यांनी पोलीस ठाणे कडील जास्तीत जास्त पेट्रोलींग करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याप्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत नियमीत रोड पेट्रोलींग, नाकाबंदी नेमण्यात येत आहे. दिनांक 23/09/2022 रोजी रात्री 7:30 वा. बार्शी बायपास रोडला पोना आप्पासाहेब लोहार, पोना महेश डोंगरे यांच्या पथकाने पेट्रोलींग दरम्यान संशयीत वाहने, इसम यांची चौकशी करण्यात येते. दरम्यान त्यांना जामगाव ता. बार्शी हद्दीत बाळराजे चौकात एक कार संशयीत उभी असल्याची माहीती मिळाल्याने व तात्काळ माहीती दिल्याने तात्काळ मदतीसाठी पोलीस पथकासह गेले असता कारमधील इसम पळून जात असताना त्यांचा पाठलाग करुन त्यातील एका इसम जागीच पकडले व इतर पाच इसम अंधाराचा फायदा घेत तेथुन पळुन गेले. लागलीच पंचासमक्ष रामा शंकर काळे, वय 20 यास पकडले त्यास पळुन गेलेल्या इसमांची नावे व पत्ते विचारता त्याने त्यांची नावे बिभीषण काळे, पल्या बिभीषण काळे, अमोल नाना काळे, चंदर भास्कर काळे, सुभाष लाला काळे, सर्व रा. आंदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद अशी असल्याचे सांगितले. तसेच कार क्र. MH 05 AX – 1286 तपासून पहाता तीच्या डीक्कीमध्ये एक तलवार, टामी कटावणी, स्क्रू ड्राईव्ह, मिरची पूड मिळुन आली. त्यामुळे खात्री झाली की, सदरचे इसम हे कोठेतरी दारोडा टाकण्यासाठी जात असून सदरचे हत्यारे पंचांसमक्ष पंचनामा करुन जप्त केले आहे सदर इसमांवर गुन्हे दाखल असल्याने सदरचे इसम हे दरोडा टाकण्याचे तयारीनेच फिरत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द बार्शी तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 274/22 भादवि कलम 399 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अटक आरोपी याचेकडे अटक मुदतीत विश्वासात घेवुन गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सांगितले कि, दिनांक 22/09/2022 रोजीच्या रात्री मी व माझे इतर साथीदार 1 ) बिभीषण काळे, 2 ) पल्या बिभीषण काळे, 3 ) अमोल नाना काळे 4 ) चंदर भास्कर काळे, 5 ) सुभाष लाला काळे, सर्व रा. आंदोरा , ता. कळंब, जि. उस्मानाबाद व वरील लोकांचे आणखीन इतर नातेवाईक 4 ( त्यांचे नावे , पत्ता माहीती नाही ) असे आम्ही मौजे मिरज जि. सांगली येथील एक दारूचे गोडाऊन फोडून त्यामधील दारूचे बॉक्स एका ट्रकमध्ये भरून आणली असून सदरचा ट्रक लपवुन ठेवलेला आहे असे मेमोरंडम पंचनाम्यात सांगितल्याने त्याचे सोबत जाऊन मौजे जामगाव ता. बार्शी शिवारातील एका खोल खदानीमध्ये लपवून ठेवलेला ट्रक व त्यामध्ये विदेशी दारू एकुण 311 बॉक्स किंमत 33,33,210 / – रु. किंमतीची दारू व 9,00,000 / – रु. किंमतीचा ट्रक मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. आरोपी यास मा. न्याय दंडाधिकारी श्री झारी सो यांचे समक्ष हजर केले असता त्यांनी सदर आरोपीस दिनांक 28/09/2022 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदरकामी सरकारी वकील प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. सदर आरोपी यांनी यापुर्वी कोठे कोठे गुन्हे केले आहेत याबाबत तपास चालु आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपूते मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री हिम्मतराव जाधव सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल हिरे सो यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांचे नेतृत्वाखाली पोसई शिरसट, पोना लोहार, पोना महेश डोंगरे, पोना केकाण, पोहेकॉ बोबडे, पोहेकॉ मंगरुळे, पोहेकॉ राठोड, पोहेकॉ देवकर, पोना शेलार, पोहेकॉ भोसले, पोहेकॉ मुंडे, पोना गाटे, पोकॉ शहाणे, पोना केकाण, पोकॉ आंधळे, पोकॉ खोकले , पोकॉ धुमाळ, पोकॉ बेदरे, पोकॉ भांगे, पोकॉ वाघमारे यांनी केलेली आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले