Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या हस्ते बार्शी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या हस्ते बार्शी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या हस्ते बार्शी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
मित्राला शेअर करा

एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रीसर्च बार्शी कॉलेजमध्ये बार्शी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बेंगलोरु येथे इसरो शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या कुमारी वैष्णवी प्रभाकर पाटील या उपस्थित होत्या.

त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व संशोधन यामधील फरक स्पष्ट करून विद्यार्थ्यांना संशोधनात करिअर करण्याचे व बार्शी तालुक्यातून जास्तीत जास्त वैष्णवी पाटील तयार होतील यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे सांगून विद्यार्थ्यांना संशोधन वृत्ती जागृत ठेवण्याची प्रेरणा दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बार्शी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री बालाजी नाटके यांनी बाल संशोधक तयार व्हावेत, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे आहे असे सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटी कॉलेजचे प्राचार्य श्री लेंगरे सर, बार्शी तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री बेंद्रे सर, बार्शी टेक्निकल चे मुख्याध्यापक श्री टकले सर, केंद्रप्रमुख श्री धनाजी जाधवर सर व वैष्णवी पाटील यांचे आई वडील ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्शी नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी माननीय श्री अनिल बनसोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटनेचा कार्यकारणभाव समजावून घेऊन आपल्यामध्ये संशोधक वृत्ती निर्माण करावी अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन बार्शी तालुक्याचे समन्वयक श्री प्रताप दराडे सर, श्री शिवकरण गोसावी सर, एमआयटी कॉलेजचे श्री अंधारे सर, श्री मुंडे सर व श्री माळी सर तसेच त्यांचा सर्व स्टाफ यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले.

सदर प्रदर्शन 27 व 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते पाच या कालावधीमध्ये एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग व रिसर्च आगळगाव रोड बार्शी या ठिकाणी होत असून प्रदर्शनात उच्च प्राथमिक गट इयत्ता 6वी ते 8वी एकूण 234 विद्यार्थी, माध्यमिक व उच्च माध्यमिक गट 142 विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक 2, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक 3 व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर 1 अशा एकूण 382 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. उद्या 28 रोजी या विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण होणार आहे.