Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > बार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप

बार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप

बार्शी तालुका शिक्षक सेनेच्या अध्यक्ष पदी युवराज जगताप
मित्राला शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्या पदाधिकारी निवडीमध्ये बार्शी शहर तालुका प्रमुख म्हणून दत्त प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षक श्री. युवराज गोवर्धन जगताप यांची निवड करण्यात आली शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्री. जयवंत हक्के, राज्य उपाध्यक्ष श्री. संतोष घोडके, जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश कोळी यांनी पत्र देऊन पदभार दिला.

सदर कार्यक्रमास मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर तसेच मनसेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील विविध प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न मार्गी लावण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या माध्यमातून पुढील काळात कार्य करण्यासाठी सर्वांनी जगताप सरांना शुभेच्छा दिल्या