केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी अंतिम प्रशासकीय मान्यता मिळून १४ कोटी ९५ लाख ३२ हजार ०२६ रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.
बार्शी तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी पुरवठा संबंधी तुटवडा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर आमदार राजाभाऊ राऊत यांनी, हा तुटवडा दूर करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाकडे पत्र व्यवहार करून, मंत्रालयत सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.
सदरच्या योजनेत केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार ५० टक्के वाटा असणार आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या मिशनसाठी लोकवर्गणी / लोकसहभागातून ग्रामपंचायतीचा देखभाल दुरुस्ती साठी १० टक्के वाटा असणार आहे. सदर योजनेतून प्रत्येक घरास नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करणे आवश्यक असून, दरडोई ५५ लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेतील गांव हे नेहमीच हागणदारीमुक्त राहील याबाबत नेहमीच ग्रामपंचायतीने खात्री करणे आवश्यक आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन निर्णयानुसार रूपये ५ कोटींपर्यंत दरडोई खर्चाच्या निकषात बसणाऱ्या स्वतंत्र व प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांना असल्याने, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सोलापूर यांनी सदर योजनेसाठी मंजूरी दिलेली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली. सदर कामांची निवीदा लवकरच प्रसिद्ध होणार असून, सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
सदर योजना तालुक्यातील खालील गावांना मंजूर झालेली असून, त्यासाठी होणारा खर्च पुढीलप्रमाणे आहे.
१) दहिटणे या गावाकरीता १ कोटी १२ लाख ४० हजार १७१ रूपये.
२) शिराळे या गावाकरीता ५९ लाख ३० हजार ७९४ रूपये.
३) धोत्रे या गावाकरीता ८८ लाख ९६ हजार ७८२ रूपये.
४) कोरेगांव या गावाकरीता ६८ लाख, ५४ हजार ५८५ रूपये.
५) मालेगाव आर. करीता २५ लाख ५७ हजार ८७३ रूपये.
६) काटेगांव या गावासाठी ४९ लाख ४० हजार २५६ रूपये.
७) हळदुगे या गावासाठी ८८ लाख ४२ हजार ३६० रुपये.
८) कोरफळे या गावासाठी ९४ लाख ६९३ रूपये.
९) तावडी या गावासाठी ६९ लाख ७३ हजार २५५ रुपये.
१०) बाभूळगाव या गावासाठी ६२ लाख २२ हजार ५०८ रूपये.
११) श्रीपतपिंपरी या गावासाठी १ कोटी ६३ लाख १८ हजार ९१८ रुपये.
१२) कासारी या गावासाठी ३९ लाख २९ हजार ०३९ रूपये.
१३) मळेगांव या गावासाठी १ कोटी २५ लाख ६६ हजार ९९२ रूपये.
१४) रातंजण या गावासाठी ७१ लाख २५ हजार ८२४ रुपये.
१५) मुंगशी (आर) या गावासाठी ४९ लाख ८० हजार ७११ रूपये.
१६) उंबरगे या गावासाठी ५४ लाख ६८ हजार ९३९ रूपये.
१७) अरणगांव या गावासाठी ७० लाख ७१ हजार २६८ रूपये.
१८) साकत या गावासाठी १ कोटी १४ लाख ८२ हजार ७१६ रूपये.
१९) नांदणी या गावासाठी ८७ लाख २९ हजार ३४२ रूपये.
More Stories
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश…
रात्री 9:58 वाजता ISRO चीआणखी एक गगनभरारी!