पानगांव ग्रामपंचायत व वांगरवाडी- तावरवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचा आज (५ ऑगस्ट) रोजी निकाल लागला. या मध्ये पानगाव ग्रामपंचायत मध्ये १५ पैकी ११ जागा जिंकत तर वांगरवाडी- तावरवाडी ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी सर्वच ७ जागा जिंकत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

पानगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित विजयी ११ उमेद्वारां मध्ये वॉर्ड क्र.१ शोभा माधव कापसे (४७३), रोहीणी पांडूरंग जमदाडे (४६२), वार्ड क्र. २ मधुन नंदकुमार दत्तात्रय काळे(४६४), अंकुश भगवान मोरे(४४६), सखुबाई शहाजी गुजले(४३५), वार्ड क्र. ३ मधून दयानंद भाऊ गाडे(६६७), जयसिंगराव पांडूरंग देशमुख(५६८), विद्या तानाजी ढेरे(६३६), वार्ड क्र.५ मधुन सदानंद भाऊ गाडे(६२५), जयश्री अविनाश जाधव(५६३), पद्मजा प्रकाश कानगुडे(५७७), या ११ जनांचा समावेश आहे तर वांगरवाडी- तावरवाडी ग्रुप ग्रामपंचायत नवनिर्वाचित विजय उमेदवारांमध्ये अनंता जगताप शितल काळे वैशाली तुपे संगीता तुपे सोमनाथ इंगळे अलका शिंदे नंदा ठोंबरे विजयी या सात जणांचा समावेश आहे.
दोन्ही ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवारांची उमेदवारांचे आमदार राजाभाऊ राऊत, माजी पक्षनेते विजय नाना राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, यांनी अभिनंदन करून भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
सर्व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या हस्ते बाजार समिती बार्शी या ठिकाणी करण्यात झाला. यावेळी ग्रामपंचायत विजयासाठी योगदान दिलेले आप्पा कानगुडे, भाऊ गाडे, बाबा कापसे, आप्पा गाडे, लक्ष्मण घोडके, आबा आवारे, दत्ता पाटील, विकास देशमुख, रवी देशमुख, नाना कानगुडे, मोहन काळे, गणेश काळे, भगवान घोलप, रवी साळुंखे, फिरोज पठाण, प्रमोद तुपे, नाईकवाडी, रशिद शेख, खंडू आडके उपस्थित होते.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल