सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे हिरक महोत्सवानिमित्त आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण हस्ते करण्यात आले.
बार्शी तालुक्यातील यावली ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार
तीन तालुक्यांचा सीमेवर वसलेले यावली गाव, गावची लोकसंख्या 2200 चा आसपास सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहून सर्व सण – उत्सव एकत्र साजरे करतात, 2021 ला झालेल्या निवडणुकीत ग्रामस्थांनी 9 सदस्यांपैकी 7 तरुण सदस्य निवडून दिले हे गावचे वैशिष्ट्य. त्याचसोबत सरपंच आणि उपसरपंच दोन्ही महिला आहेत. गावामध्ये बंदिस्त गटार, पिण्याचे शुद्ध पाणी, जलसंधारण, पथदिवे, कचराकुंडी व्यवस्था आदी कामे झाली असून अजून बरीच कामे सुरू आहेत. गावाने “ स्व. आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धा ” अर्थातच “ स्मार्ट ग्राम ” या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवत रू.10 लाखांचे पारितोषिक मिळवले आहे. याचे वितरण दि. 13 मे 2022 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे पालकमंत्री दत्तामामा भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील मॅडम, इशाधिन शेळकंदे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी गावच्या सरपंच रुपाली तुरे, उप सरपंच निवेदिता उकरंडे, माजी सरपंच प्रल्हाद तुरे सर, ग्रामसेवक किरण वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य अमित सरवदे, शरद काकडे, सौ. वैशाली सतीश गायकवाड, सौ. माधुरी निलेश उबाळे, जब्बार बागवान, आप्पा मांजरे, सौ. सुवर्णा काका सरवदे , अनिता देवकते मॅडम, संजय क्षीरसागर , समाधान उकरंडे, तात्या कोठारे आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल ग्रामपंचायत टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राज्य सरकार ग्रामविकासासाठी अनेक योजना राबवित आहे. शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाणारा निधी जनकल्याणासाठी आहे. प्रत्येक नागरिकांनी गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे. ग्रामविकासाच्या योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा आहे.
ग्रामीण भागात विकासाच्या योजना चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यातूनच एक आदर्श गाव तयार होऊन आदर्श ग्रामपंचायती तयार होत आहेत. गावच्या प्रगतीसाठी सरपंच, ग्रामसेवक यांना महत्व आहे. त्यांनी विविध योजना गावात राबवून विकास करावा. कोणतेही काम पारदर्शिपणे केले तर गावाचा कायापालट होऊ शकतो. जिल्हा परिषदेने कोरोनाच्या काळात आरोग्य, शिक्षण तसेच विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्या. त्यामध्ये माझे गाव कोरोनामुक्त गाव’ ही जिल्ह्याची योजना महाराष्ट्रात राबविण्यात आली.
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने पुरस्कार मिळाला म्हणून तेथेच न थांबता आणखी जोमाने काम करावे. प्रत्येक नागरिकाने ग्राम विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही केले.
समारंभाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ईशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल