Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > बार्शी येथे मोफत बाल रुग्ण कॅन्सर क्लिनिक ओपीडी चे उद्घाटन

बार्शी येथे मोफत बाल रुग्ण कॅन्सर क्लिनिक ओपीडी चे उद्घाटन

बार्शी येथे मोफत बाल रुग्ण कॅन्सर क्लिनिक ओपीडी चे उद्घाटन
मित्राला शेअर करा

मोफत बाल रुग्ण कॅन्सर क्लिनिक ओपीडी चे उद्घाटन
लायन्स क्लब बार्शी टाउन व साई संजीवनी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी सकाळी 11 ते दु 2 या वेळेत मोफत बाल रुग्ण कॅन्सर क्लिनिक(OPD) कार्यन्वित झाले आहे.

साई संजीवनी हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन निमित्ताने श्री मंगेश चिवटे ,विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष आणि माननीय आ. राजाभाऊ राऊत आणि ला डॉ राहुल मांजरे यांच्या हस्ते या कॅन्सर च्या पर्मनंट प्रोजेक्ट चे उदघाटन अतिशय उत्साह पूर्व वातावरणात झाले.श्री मंगेश चिवटे सरांनी लायन्स क्लब बार्शी टाउनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब बार्शी टाऊन अध्यक्ष अमित कटारिया, सचिव आदित्य कोठारी, खजिनदार राजाभाऊ काळे तसेच ज्येष्ठ सदस्य अतुल भाई सोनीग्रा, विनोद बुडूख, वासुदेव अण्णा ढगे, रवी प्रकाश बजाज, डाॅ. अंधारे सर, डॉ. योगेश कुलकर्णी आणि राजेश लोढा व लायन सभासद उपस्थित होते.