सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन च्या मान्यतेने प्रायोजक अग्रवाल समाज बार्शी यांच्या सहकार्यातून अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त चेस क्लब बार्शी आयोजित रविवार दिनांक 02 ऑक्टोंबर 2022 रोजी मातृमंदीर ढगे मळा बार्शी येथे जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ चाचणी खुला गट (मुली ) व सर्वांसाठी खुली असणारी अग्रसेन चषक बुध्दीबळ स्पर्धा अशा दोन स्वतंत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक ट्राॅफीज पदक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच खुला गट मुलींमधून चार खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होईल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छुक खेळाडूंनी श्री.नितीन अग्रवाल (9271723848) व प्रा. चंद्रकांत उलभगत (9850487740) यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन चे सचिव सुमुख गायकवाड यांनी केले.
यावेळी अग्रवाल समाज बार्शीचे योगेश अग्रवाल, दिपक अग्रवाल, सुनील अग्रवाल, चेस क्लब बार्शीचे विद्याधर जगदाळे, दत्तात्रय गोरे, सुहास शेटे आदी उपस्थित होते.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार