बार्शी : सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशन च्या मान्यतेने प्रायोजक श्रद्धा हॉस्पीटल बार्शी यांच्या सहकार्यातून व बार्शी चेस अकॅडमी बार्शी आयोजित श्रद्धा हॉस्पीटल बार्शी येथे रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय श्रद्धा चषक खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी, पदक, व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे . स्पर्धेत सहभागी होऊ इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी बार्शी चेस अकॅडमी च्या स्नेहा निंबाळकर ( 7083987365 ) यांचेशी संपर्क कराण्याचे अवाहन सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशन चे सचिव सुमुख गायकवाड व बार्शी चेस ॲकॅडमी चे बी. के. भालके सर यांनी केले आहे.
यावेळी बार्शी चेस ॲकॅडमी चे बी. के. भालके सर, शिवाजी निंबाळकर, प्रद्युम्न देशमाने साहेब, अनुराधा गुळवे मॅडम, दयानंद रेवडकर सर, राहुल मिरगणे, गोरे सर उपस्थित होते.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन