Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शीचे शफिक नाईवाडी यांची जिल्हा परिषद सोलापूर कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती

बार्शीचे शफिक नाईवाडी यांची जिल्हा परिषद सोलापूर कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती

बार्शीचे शफिक नाईवाडी यांची जिल्हा परिषद सोलापूर कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती
मित्राला शेअर करा

बार्शी :- शफिक नाईवाडी हे जिल्हा परिषद सोलापूर कार्यकारी अभियंता
कर्मवीर जगदाळे मामाच्या संस्थेत शिक्षण झालेले शिक्षकाचे सुपूत्र शफिक नाईवाडी हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यार्थी असून त्यांच्या या निवडीने संस्थेच्या वैभवात आणखी भर पडली आहे कर्मवीर जगदाळे मामांनी लावलेल्या रोपट्यांना किती गोड फळे आहेत संस्थेच्या विविध शाखांच्या माध्यमातून आनेक डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासकीय आधिकारी, व्यवसायिक, खेळाडू निर्माण झाले.


नाईकवाडी यांचे कुटुंब बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटूंब बार्शीत स्थिरावले. खूप मोठे कुठूंब सुशीक्षीत व संस्कारीत आहे बार्शीच्या सर्वात मोठ्या नाईकवाडी प्लाटची मालकी याच कुठूंबाची आहे परंतु कुठलाही गर्व बडेजाव न करता ज्यू इंजिनिअर शाखा अभियंता उपअभियंता ते जिपचे कार्यकारी अभियंता हा त्यांचा प्रवास प्रेरणादाई आहे. माढा – करमाळा उपअभियंता म्हणून त्यांनी चांगली जबाबदारी पार पाडल्याने.

  नाईकवाडी हे प्रेमळ सज्जन व्यक्ती त्यामुळे सर्व समाजातील मोठा मित्र परिवार आहे. नोकरी लागताना स्व.टी.एन(बाप्पा)पाटील यांनी वडिलांची मैत्री जागविली असे अभिमानाने सांगतात.मुलगा डिझाइन मध्ये इंजिनिअर आहे.जबाबदारी वाढली असून अल्पावधीत जिल्हावासियांची कामे मार्गी लागोत व त्यासाठी उतम संधी बरोबर सुंदर अरोग्य मिळो कुठल्याही यशस्वी पुरुषामागे खंबीर पत्नी असते असे साहेबच बोलता बोलता म्हणाले तेही महत्वाचे आहे. आईवडील कुटूंब यांचे प्रेम साथ व मित्र स्नेही जिपचे सीईओ अप्पर सिईओ व माझ्या विभागातील कर्मचारी सहकारी यांची साथ मला मिळाली असे त्यांनी सांगितल.

बार्शीच्या विकासासाठी शासनाच्या विविध विकासयोजना निस्वार्थीपणे राबवण्यासाठी त्यांना उत्तम अरोग्य मिळो हिच भगवंताला प्रार्थना