राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये बार्शीचे विशाल नागरगोजे यांची DYSP पदी निवड झाली, विशाल हे महाराष्ट्र विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय येथे झाले. त्यांनी पदवीधर शिक्षण पुणे येथील कृषी महाविद्यालय येथे झाले.
त्यानंतर त्यांनी स्पर्धी परिक्षेची तयारी करण्यास सुरूवात केली. स्वत:ला अभ्यासात वाहून घेत त्यांनी सर्वप्रथम MPSC मधील विक्रीकर निरीक्षक, ACST पद अशी पदे मिळविली एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत त्यांनी चिकाटी सोडली नाही अन् आज त्यांनी बार्शीचे नाव मोठे करत एमपीएस्सी मार्फत DYSP या पदावर ते विराजमान झाले आहेत. सर्व बार्शीकरांना आभिमान वाटावा असं यश त्यांनी मिळवल. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्धल त्यांचे आभिनंदन पुढील वाटचालीस बार्शीकरांच्या वतीने आशिर्वाद.

More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ