Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शीच्या सौ.शाह कन्या प्रशालेचा 98 टक्के निकाल

बार्शीच्या सौ.शाह कन्या प्रशालेचा 98 टक्के निकाल

बार्शीच्या सौ.शाह कन्या प्रशालेचा 98 टक्के निकाल
मित्राला शेअर करा

बार्शी – येथील वाय.पी. एज्युकेशन सोसायटी बार्शी संचलित सौ.हि.ने.न.शाह कन्या प्रशाला बार्शी या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 98 टक्के लागला आहे.

या शाळेच्या दहावीच्या परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान कु.साक्षी रामेश्वर डुकरे हिला मिळाला असून तिला परिक्षेत 95.80% टक्के गुण मिळाले आहेत तर द्वितीय क्रमांक कु.प्रिया शंकर कवडे 94% व कु.पायल राहुल कदम 94% तर तृतीय क्रमांक कु.श्रद्धा नागेश घोलप हिला 93.80 % टक्के ,चतुर्थ क्रमांक कु. कलाश्री भगवान पवार 91.80 % तर पाचवा क्रमांक कु.सलोनी किरण भांगे 89.40 टक्के गुण मिळाले आहेत.इयत्ता दहावीच्या परीक्षेला शाळेचे एकूण 119 विद्यार्थी होते तर त्यापैकी 116 विद्यार्थिनींनी दहावीचा पेपर दिला होता. यामध्ये विशेष प्रावीण्य मध्ये 49, प्रथम श्रेणीत 39 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 25 विद्यार्थिनींनी यश मिळविले आहे.

या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थिनींनीचे संस्थेचे अध्यक्ष चेतनभाई देसाई, उपाध्यक्ष अतुलभाई कोठारी,अजय महाजन, सचिव नागनाथ देवकते, संचालक शशिकांत गोडगे,मुख्याध्यापिका सौ.उज्वला व्हनाळे, वर्गशिक्षक शशिकांत गलांडे,चिन्मय वालवडकर, सहकारी शिक्षक संदेश घाडगे, सौ.ज्योती अग्रवाल, आयुब शेख, महेश काळे ,सोमनाथ पाटील, रवीकिरण पोरे, सौ.वैष्णवी हातोळकर सौ.उषा वीर आदीं शिक्षकांसह सिद्राम हिप्परगी, बालाजी भोळे, सौ.कमलताई खाडे, विश्वास डोईफोडे आदीं कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

यावेळी यशस्वी विद्यार्थिनींचा मुख्याध्यापिका सौ.उज्वला व्हनाळे यांनी शाळेच्या वतीने सत्कार केला व पुढील शिक्षणासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.