बार्शी : शहरातील नगर परिषद जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील जुन्या, पुरातन नृसिंह देवाच्या लहान मंदिराचे रूपांतर मोठ्या आणि सुसज्ज मंदिरात करून जीर्णोद्धार करण्यात आला. भोसेकर पुजारी यांनी मधुकर भिल्ल यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घेतली.

या कार्यक्रमात आमदार राजेंद्र राऊत, नगरसेवक ॲड. महेश जगताप, भीम टायगर संघटनेचे शंकर वाघमारे यांच्यासह ललित आर्टचे राजेंद्र शिंदे, शहाजी नागटिळक, प्रमोद पतंगे, श्री कोत्तावार, बाबा टमके, बाळासाहेब तिकटे, शिवा माळी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बबन चकोर, राजा पवार, बंडू चव्हाण, नारायण ननवरे, बापू माईनकर, उगम कोठारी, अंकुश पाचकुंड आदी उपस्थित होते. राजेंद्र शिंदे यांनी आ. राजेंद्र राऊत यांचा सत्कार केला.
यावेळी दिवसभर भक्तांसाठी महाप्रसाद देण्यात आला. अमित नागटिळक, सुमीत नागटिळक, रोहन शिंदे, मयूर शिंदे यांच्यासह सावळे गल्ली, माळे गल्ली येथील मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार